न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- चिंचवडगावातील प्राचीन धनेश्वर मंदिरात महादेवाचा चंदन उटी सोहळा व एकतारी भजनाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. ०९) रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या भजनी मंडळांचा एकतारी भजनाचा अखंड सोहळा पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी नऊ वाजता श्री धनेश्वर महादेवाला लघुरुद्र अभिषेक, दुपारी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी साडेसात वाजता नित्य आरती व चंदन लेप सोहळा, रात्री आठ नंतर अखंडपणे एकतारी भजन सोहळा पार पडणार आहे. भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. धनेश्वर विश्वस्त मंडळ ट्रस्ट (चिंचवड) यांनी केले आहे.