न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२४) :- अट्टल वाहनचोरी करणाऱ्या टोळीस दरोडा विरोधी पथकाने अटक करून त्यांच्याकडून ६,६५,००० रूपयांच्या १४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी केली आहे.
आळंदीतील बस स्टॉप या ठिकाणी दोन इसम चोरीची गाडी घेवून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या टिमने त्या ठिकाणी सापळा रचला. आरोपी १) शुभम अशोकराव लोंढे (वय २१ वर्षे रा. शेळके महाराज यांचे खोलीत खंडोबा मंदीराजवळ, आळंदी), २) सचिन समाधान दळवी (वय २३ वर्षे रा. शेळके महाराज यांचे खोलीत खंडोबा मंदीराजवळ, आळंदी) यांना ताब्यात घेतले.
दोघांनी आळंदी पोलीस ठाणे येथे गु र नं ३०८/२०२३ भादवि कलम ३७९ हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना सदर गुन्हयात (दि. ०९) रोजी अटक करण्यात आली. तसेच त्यांचा तिसरा साथीदार यश शिवाजी भोसले (रा. दत्त मंदीराजवळ, आळंदी देवाची) यास दि. १०/०५/२०२४ रोजी ताब्यात घेवुन, त्याच्याकडे अधिक सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याचा देखील दाखल गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीतांचा पुर्व इतिहास तपासुन, आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने, आरोपीतांची दिनांक १४/०५/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडीची रिमांड घेवुन, सखोल व बारकाईने तपास करून, त्यांच्याकडुन १) बजाज पल्सर ०१, २) हिरो सलेंडर १२, ३) बजाज अॅव्हेंजर ०१ अशा एकुण १४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.











