न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२४) :- लोकसभा निवडणुकीमुळे परिचारिका दिवस १२ मे ऐवजी दिनांक १५ मे रोजी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि मधुमेह रूग्ण संघाच्या वतीने दादा-दादी उद्यानातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान महाजन, मधुमेह संघाचे डॉ. दिगंबर इंगोले मंचावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.डी वाय कॉलेज ऑफ नर्सिंगच्या डॉ खुर्शिद जमादार या होत्या. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गीत शोभना जोशी यांनी म्हटले.
पाहुण्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षांच्या मनोगतानंतर परिचारिकांचा सत्कार आशा नष्टे यांनी जेष्ठ नागरिक संघास दिलेल्या पंचवीस हजार रुपये देणगीच्या व्याजातून भेट वस्तू देऊन करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. ज्योती इंगोले यांनी केले. आभार सुभाष जोशी उपाध्यक्ष यांनी मानले.
यावेळी चंद्रश्खर जोशी, आनंदराव मुळुक यांच्यासह सर्व संघांचे अध्यक्ष, सदस्य व कार्यकारणी सदस्य हजर होते. संघाच्या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. संघाच्या सदस्य असणाऱ्या आशा नष्टे, शोभना जोशी, पुष्पांजली सूर्यवंशी, पुष्पा लंके, विभावरी कोटस्थाने, सविता साठे, वत्सला वाघचौरे, क्षिरसागर, माधुरी डिसोजा या ज्येष्ठ परिचारिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.











