न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, पिंपरी येथील राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष वैभव जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे, संघटनेचे सचिव रावसाहेब गंगाधरे,उपाध्यक्ष योगेश जाधव,संघटक दिलीप कैतके, सहसचिव बाळासाहेब पाटील राहुल मदने,कैलास जाधव,बबनराव मदने,उमेश भोसले,गणेश जोगदंड तसेच शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप राजे मुटकुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.











