न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२४) :- तळवडेच्या कॅनबे चौकातील मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ‘पाईप्स’ ठेवण्यात आलेले आहेत. आधीच हा रस्ता अरुंद आहे. तसेच या चौकातून चाकण एमआयडीसीसह आयटी कंपन्या व औद्योगिक कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असते.
हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. या पाईपांच्या ढीगामुळे प्रवाशांना तसेच वाहतूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागत आहे.
याबाबत संबंधित यंत्रणा कोणतीच उपाययोजना करत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर असणारे पाईप्स हटविण्याची मागणी श्रीनिवास बिरादार यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्तांसह पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

















