- भाजपच्या विद्यमान आमदारांसह शहराध्यक्षांना खुली ऑफर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२४) :- शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे. पिंपरी, चिंचवड विधानसभा ही तुतारी चिन्हावरच लढवली जाणार आहे. दोन्ही विधानसभेवर शरद पवार यांची ताकद आहे. २००९ ते आजतागायत इतिहास पाहिल्यानंतर या मतदारसंघावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा मतदार असल्याचे मत तुषार कामठे यांनी व्यक्त केल आहे.
दरम्यान, कामठे यांनी जगताप कुटुंबीयांवर भाष्य करत अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांसाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली असतील असं म्हणत कामठे यांनी शंकर जगताप आणि विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
शंकर जगताप आणि अश्विनी लक्ष्मण जगताप या दोघांपैकी एकाला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर दुसरा व्यक्ती काय निर्णय घेणार आणि तो कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन लढणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.















1 Comments
Blair Brosch
Woah! I’m really loving the template/theme of this site. It’s simple, yet effective. A lot of times it’s hard to get that “perfect balance” between usability and appearance. I must say you have done a great job with this. Also, the blog loads super quick for me on Chrome. Exceptional Blog!