न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०२४) :- आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पिंपरी चिंचवड शहरातून जाणार आहे. या पालखी मार्गाची पाहणी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, हरविंदरसिंग बन्सल, संध्या वाघ, विलास देसले, महेश कावळे, वैशाली ननावरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.











