न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२४) :- विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती. त्यामुळे सर्व १२ उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखले केले. भाजकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांनी अर्ज भरला आहे.
भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अमित गोरखे यांनी भारतीय जनता पार्टी च्या वतीने विधानसभा परिषदेचा अर्ज सादर केला. गोरखे हे निवडून आल्यास शहराला विधानसभेचे तीन आणि विधानपरिषदेचे दोन असे पाच आमदार मिळणार आहेत.
त्यावेळी भाजपा आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप आदी उपस्थित होते.