न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२४) :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. २०) रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात नवमहाराष्ट्र महाविद्यालय पिंपरीगाव या ठिकाणी सायंकाळी ठीक ४ वाजता या भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमस्थळी भव्य असा वॉटरप्रूफ सभामंडप उभारण्यात आला आहे. शिवाय १२ ते १५ हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शरद पवार यांच्या जुन्या सहकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवनिर्वाचित आठ खासदारांचाही सन्मान यावेळी केला जाणार आहे. पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे, प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, नव्यानेच पक्षात प्रवेश घेतलेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, धनंजय भालेकर यांच्यासह विनायक रणसुभे, उपाध्यक्ष दिलीप पानसरे, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, ओबीसी विभाग शहराध्यक्ष भाई विशाल जाधव, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर राजरत्न शिलवंत, सरचिटणीस सचिन गायकवाड, पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते















