न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२५) :- दिघीत डब्ल्यू एफ एक्स या ट्रेनिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास पंधरा टक्के परतावा देण्याचे तीघांनी आमिष दाखवत ऐंशी लाख रुपये फिर्यादी यांना गुंतवण्यास भाग पाडले.
त्या गुंतवणुकीवर सहा महिने नऊ लाख २९ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर मूळ रक्कम आणि परतावा देण्याची मागणी केली असता ती देण्यास टाळाटाळ केली. अशा रितीने तब्बल ७० लाख ७१ हजार रुपये आणि परतावा न देता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे.
दरम्यान फिर्यादीप्रमाणेच आणखी लोकांची एक कोटी दहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करीत स्वतःचे राहते घर सोडून आरोपी निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी फिर्यादीने आरोपी सचिन कोलते, त्याची पत्नी महिला आरोपी आणि त्याचे वडील अविनाशराव कोलते यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
















