न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२५) :- संत तुकारामनगर येथे सामाजिक कार्यकर्त्यावर चाकु उगारुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी राजेश वाबळे यांनी आरोपी शशिकांत भालेराव याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. संत तुकारामनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोउनि गाडेकर हे करीत आहेत.


















