न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी प्रतिनिधी :- भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कासारसाई येथील बलात्कार पिडीत दोन अल्पवयीन मुलींच्या पालकांची भेट घेतली
काही दिवसांपूर्वी कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांच्या मुलांनी या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारचा गंभीर गुन्हा केला होता.
या घटनेच्या निषेधार्थ भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन व या घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस अधिकारी शिरीष जाधव यांना मागण्यांचे निवेदन दिले.
आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे शोधून आरोपींना फास्ट-ट्रॅक कोर्टातुन लवकरात लवकर फाशी व्हावी याकरिता सबळ पुरावे शोधण्याचे तसेच पिडीत मुलींच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेचा लाभ मिळावा आणि त्या वस्ती वर महिला पोलीस तैनात करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देसाई यांनी दिले.
यावेळी आधार सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष विकास भुंबे व आदी कार्यकर्ते उपस्थीत होते