न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड प्रतिनिधी :- देहुरोड येथील गाॅड इज लव्ह मिनिस्ट्रिजचे पास्टर रेव्ह. डाॅ. सुनिल साठे सर यांची महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या ( Maharashtra Minority Christian Development Council ) मावळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
MMCDC चे पुणे जिल्हा अध्यक्ष बिशप डाॅ. एम. बी. मनोज यांजकडून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. बिशप डाॅ.एम. बी. मनोज यांच्यासह पास्टर आनंद कांबळे, ब्रदर अमृत नायडू, पास्टर अनिता नायडू, पास्टर सुरेखा मनोज, ब्रदर सालोमन, सिस्टर सलोमी यांनी रेव्ह. डाॅ. सुनिल साठे सर यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
रेव्ह. डाॅ. सुनिल साठे सर यांनी बिशप डाॅ. एम. बी. मनोज यांचे नियुक्ती केल्याबद्दल आभार मानून MMCDC या संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे व समाज प्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे, व्यापक प्रमाणात करुन देशपातळीवर संघटनेचा प्रसार व नावलौकिक करणार असल्याचे सांगितले.