न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- मोहननगर येथे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांच्या संयुक्त विद्यमाने ”होमिओपॅथिक औषध उपचार शिबीराचे” आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील दीडशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रुग्णांना होमिओपॅथिक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ डॉक्टर गणेश अंबिके, डॉक्टर सरोज अंबिके व डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्यावतीने डॉक्टर डी. बी. वर्मा उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव तसेच शिवसेना मोहननगर शाखेच्या वतीने करण्यात आले होते.