संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ डिसेंबर २०२५) :- प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद नढे यांच्या झंझावती प्रचारदौऱ्याला विजयनगर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी सायंकाळी झालेल्या या फेरीदरम्यान परिसरात दिवाळीचा माहोल जाणवत होता. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि सुमारे २० फूट लांबीच्या हाराने कार्यकर्त्यांनी नढे यांचे जल्लोषात स्वागत केले.
प्रचारफेरीदरम्यान समर्थ कॉलनी, गणेश कॉलनी, साई कॉलनी आदी भागांत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. “नाद घुमू दे — कमळ फुलू दे” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जोशात साथ दिली.
आपले मनोगत व्यक्त करताना विनोद नढे म्हणाले, “माझे संस्कार आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा हीच माझ्या जीवनाची खरी ओळख आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवणे, हीच माझी प्राथमिकता राहील.”
प्रचारफेरीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या, सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. पुढील दिवसांतही विविध भागांत प्रचारफेऱ्या घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


















