- “काय बोलते काम, बोलते कार्य” ! या उक्तीचा प्रभागात सर्वत्र बोलबाला…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. 07 जानेवारी 2026) :- पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजप उमेदवार सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून, त्यांच्या कार्यावर आधारित प्रचारामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. “काय बोलते काम, बोलते कार्य” या ब्रीदवाक्यानुसार कुंदाताई संजय भिसे यांनी गेल्या अनेक वर्षांत केलेल्या विकासकामांची चर्चा सध्या प्रभागात सर्वत्र होताना दिसत आहे.
घराघरांत जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधत कुंदाताई भिसे यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना तसेच मुलांसाठी खेळाची मैदाने या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणाऱ्या या उमेदवाराला प्रभागातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. “काम करणारा उमेदवार हवा आहे, फक्त भाषण करणारा नाही,” अशी प्रतिक्रिया अनेक मतदारांनी दिली. भाजपने शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्याचा अनुभव प्रभाग २८ मधील नागरिकांना येत असल्याचेही मतदारांचे म्हणणे आहे.
कुंदाताई भिसे यांच्यासह पॅनल मधील उमेदवार अनिताताई काटे, शत्रुघ्न काटे, संदेश काटे यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला मोर्चाचे कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत असून, संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे. कुंदाताई भिसे यांच्या प्रचार सभांमध्ये महिलांची विशेष उपस्थिती दिसून येत आहे.
दरम्यान मंगळवारी प्रभागातील पार्क रॉयल, भूमी आल्युम, साई मारिगोल्ड, दिव्या हाईट्स, रॉयल इंपिरीओ या सोसायटीतील नागरिकांसोबत कुंदाताई यांनी संवाद साधला. त्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विकासकामांचा ठोस अनुभव आणि थेट संवादामुळे “काम बोलते” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र प्रभाग २८ मध्ये दिसत असून, येत्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.












