- काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी यंदा प्रभागात परिवर्तन घडविण्याचा निर्धार..
- घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या मोनिकाताईंना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोनिकाताई नवनाथ नढे हे जनतेची सर्वात पहिली पसंती म्हणून पुढे येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात विकासाची नवी दिशा दिली असून त्याच विश्वासावर काळेवाडीत विकासाचा अजेंडा पुढे नेण्याची जबाबदारी मोनिकाताईंनी खांद्यावर घेतली आहे. घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या मोनिकाताईंना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून वातावरण पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
प्रभागातील पाणीटंचाई, ड्रेनेजची दुरवस्था, वाढते अतिक्रमण आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार या ज्वलंत प्रश्नांवर मच्छिंद्र तात्या तापकीर यांनी निर्भीडपणे बोट ठेवले आहे. इतर उमेदवार फक्त आश्वासनांची खैरात वाटत असताना तापकीर प्रत्यक्ष उपाययोजनांची ठोस रूपरेषा मांडत आहेत. “फक्त समस्या सांगणार नाही, त्या सोडवून दाखवणार,” ही त्यांची ठाम भूमिका नागरिकांना भावत आहे. स्मार्ट प्रभागाची संकल्पना, दर्जेदार पाणीपुरवठा, सक्षम ड्रेनेज व्यवस्था आणि अतिक्रमणमुक्त रस्ते ही त्यांची प्रमुख प्राधान्ये आहेत.
कोपरा सभा, पदयात्रा, प्रचार रॅली आणि थेट संवादाच्या माध्यमातून मोनिकाताई यांनी मतदारांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. गल्लीबोळातून फिरत ते नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत आहेत आणि त्यावर त्वरित उपाय सुचवत आहेत. हा थेट, बेधडक आणि आक्रमक प्रचारच विरोधकांना अस्वस्थ करत आहे. जनतेतून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांचा प्रचार पोकळ आणि दिशाहीन ठरत आहे.
“हक्काची मोनिकाताई” अशी ओळख त्यांनी प्रभागात निर्माण केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि विकासात्मक कामांत सक्रिय असलेल्या ताईंवर नागरिकांचा विश्वास आहे. कोणताही प्रश्न असो, त्या कायम पुढे येऊन सोडवतात, अशी भावना प्रभागात सर्वत्र ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच घराघरांतून त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची ताकद प्रभाग २२ मध्येही दिसून येत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली कामे मतदारांच्या स्मरणात आहेत. त्याच विकासाच्या गतीला पुढे नेण्यासाठी मोनिकाताई नवनाथ नढे या योग्य उमेदवार असल्याचे मतदार ठामपणे सांगत आहेत.
एकूणच प्रभाग क्रमांक २२ मध्ये निवडणूक मतदान पाच दिवसावर येऊन ठेपले असताना, जनतेचा वाढता ओढा, आक्रमक प्रचार आणि ठोस विकासाचा अजेंडा यामुळे मोनिकाताई या विजयाच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. घड्याळाच्या टिक-टिकेसोबतच प्रभाग २२ मध्ये विकासाची नवी वेळ सुरू होणार, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.












