- या तारखेला विशेष सभेचे आयोजन..
- भाजपच्या या सदस्यांपैकी एकाची लागणार अध्यक्षपदी वर्णी…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही विशेष सभा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात होणार आहे.
नगरसचिव विभागाकडून जारी करण्यात आलेल्या कार्यपत्रिकेनुसार, विषय क्रमांक १ अंतर्गत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २१ (१) नुसार स्थायी समितीच्या सभापती पदाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या विशेष सभेच्या पीठासीन अधिकारी म्हणून पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका या कामकाज पाहणार आहेत. संबंधित नियमांनुसार निवड प्रक्रिया त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
नगरसचिव मुकेश कोळप यांनी स्थायी समिती सदस्यांना सभेबाबतचे पत्र पाठवून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीमधील सदस्यांची नावे…
भारतीय जनता पार्टी...
१. अभिषेक बारणे
२. शालिनी गुजर
३. मनिषा चिंचवडे
४. संदीप कस्पटे
५. सारीका गायकवाड
६. योगिता नागरगोजे
७. कृष्णा सुरकुले
८. शीतल वर्नेकर
९. अर्चना करांडे
१०. मधुरा शिंदे
११. बाबासाहेब त्रिभुवन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…
१.सविता आसवानी
२.संतोष कोकणे
३.संदीप वाघेरे
४.विकास साने
शिवसेना
१. सुलभा उबाळे











