- दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त..
- दररोज घडतात अपघात…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी २०२६):- प्रभाग क्रमांक १८ मधील केशवनगर, चिंचवड येथे उद्यम सहकारी बँकेसमोरील मुख्य चौकात गेल्या दोन महिन्यांपासून चेंबरभोवती मोठा व धोकादायक खड्डा पडला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा चौक अत्यंत वर्दळीचा असूनही संबंधित विभागाकडून अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी आतापर्यंत दररोज अपघातांच्या घटना घडत असून काही नागरिक जखमीही झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
मुख्य रस्त्यावर एवढा मोठा खड्डा असूनही दोन महिने कारवाई होत नाही, ही गंभीर बाब आहे. अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचार खर्चाची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल उपस्थित करीत महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी. त्वरित काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.











