- आ. शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांचे अर्ज सादर…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी समितीनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दि. २ मार्च २०२६ रोजी या सर्व समित्यांच्या बैठका घेऊन सभापतींची निवड करण्यात येणार आहे.
दरम्यान, आज बुधवारी भाजपा आमदार शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी नगरसचिव विभागाकडे आपले अर्ज सादर केले.
यात शिक्षण समिती सभापतीपदासाठी रविना सागर आंघोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीसाठी कैलास कुटे, महिला व बालकल्याण समितीसाठी रानी माई पठारे, विधी समितीसाठी सुजाता निलेश बोऱ्हाटे, तर शहर सुधारणा समितीसाठी संजय नाना काटे यांचा समावेश आहे.
या निवड प्रक्रियेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. २ मार्च रोजी विधी समितीची बैठक सकाळी ११.०० वा., महिला व बालकल्याण समिती ११.३० वा., शहर सुधारणा समिती दुपारी १२.०० वा., क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती १२.३० वा. आणि शिक्षण समिती दुपारी १.०० वा. होणार आहे. यात या अधिकृत निवडी करण्यात येणार आहेत.
विधी समिती सदस्य
भाजप – ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोऱ्हाटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम
राष्ट्रवादी काँग्रेस – शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे
शहर सुधारणा समिती सदस्य
भाजप – अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय (नाना) काटे, सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे
राष्ट्रवादी काँग्रेस – डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य
भाजप – कैलास कुटे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे
राष्ट्रवादी काँग्रेस – भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे
शिक्षण समिती सदस्य
भाजप – पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रविना आंघोळकर, कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोऱ्हाडे
राष्ट्रवादी काँग्रेस – प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने
महिला व बालकल्याण समिती सदस्य
भाजप – पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे
राष्ट्रवादी काँग्रेस – निकिता कदम, सारिका मासूळकर, मनिषा लांडे











