- नगरसचिवांकडे एकमेव अर्ज सादर…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 25 फेब्रुवारी 2026) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अभिषेक बारणे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
आज बुधवारी त्यांचा अधिकृत अर्ज नगरसचिव विभागाकडे सादर करण्यात आला. यावेळी आमदार शंकर जगताप, गटनेते प्रशांत शितोळे यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात होणार आहे.
या विशेष सभेच्या पीठासीन अधिकारी म्हणून पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका या कामकाज पाहणार आहेत. संबंधित नियमांनुसार निवड प्रक्रिया त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यावेळी अभिषेक बारणे यांची अधिकृत निवड जाहिर करण्यात येणार आहे.
अशी आहेत स्थायी समितीमधील सदस्यांची नावे…
भारतीय जनता पार्टी..
शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड,
योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…
सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने.
शिवसेना…
सुलभा उबाळे












