- मावळते आयुक्त श्रावण हर्डीकरांचा कार्यकाल संपला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ मार्च २०२६) :- भारतीय प्रशासकीय सेवेतील अनुभवी अधिकारी डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी आज सोमवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला.
मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नूतन आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्याकडे पदभाराची सूत्रे सोपवली.
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सूर्यवंशी यांनी शहराच्या विकासाला गती देण्यासोबतच प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखून पारदर्शक कारभारावर भर देण्याचा मानस डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या प्रशासकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.








