न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१८ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित आमदार–महापौर चषक टी-२० २०२६ स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली असून उद्घाटनाच्या सामन्यात तापकीर सर्व्हिस स्टेशन संघाने प्रभावी विजय मिळवला. बजाज वाळके क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत १६ संघांचा सहभाग आहे.
उद्घाटनाचा सामना पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघ आणि तापकीर सर्व्हिस स्टेशन संघ यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करताना तापकीर सर्व्हिस स्टेशनने २० षटकांत ४ बाद २०६ धावांचा भक्कम डाव उभारला. सुशांत कांबळे (नाबाद ८५) आणि सुमीत तापकीर (नाबाद ५८) यांनी दमदार खेळी केली.
प्रत्युत्तरात महानगरपालिका संघ २० षटकांत ८ बाद १७० धावांपर्यंत मजल मारू शकला. निखिल आव्हाड (नाबाद ७५) यांची झुंजार खेळीही अपुरी ठरली.
तापकीर सर्व्हिस स्टेशनने ३५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. सुशांत कांबळे यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.














