न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि.२४ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर ‘स्मार्ट आणि सुरक्षित’ बनवण्यावर भर देण्याची गरज नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. शहराचा विकास केवळ रस्त्यांपुरता मर्यादित न ठेवता नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गोरखे यांनी शहरात ‘स्वर्गीय अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी केली. तसेच मनपा शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, डिजिटल क्लासरूम्स आणि तज्ज्ञ शिक्षकांची गरज अधोरेखित केली.
महिला सुरक्षेसाठी स्मार्ट लाइटिंग आणि सीसीटीव्ही जाळे मजबूत करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. महिला बचत गटांसाठी ‘महिला उद्योजकता निधी’ उभारण्याचीही मागणी करण्यात आली. पर्यावरणासाठी मिनी फॉरेस्ट आणि ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यावर भर देत, महापालिकेचे कामकाज पूर्णपणे डिजिटल करण्याची त्यांनी आग्रही मागणी केली. हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची मांडणी नसून, तो शहराच्या भविष्याचा आराखडा आहे. पिंपरी-चिंचवडला एक आदर्श आणि सर्वसमावेशक शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– अनुराधा गोरखे, नगरसेविका…














