- पिंपळे सौदागरमध्ये एका सोसायटीतच दररोज ६४० लिटर पाणी बचत…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २९ मार्च २०२६) :- पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने “फ्लश सेव्ह वॉटर अभियान” राबविण्यात येत असून, पिंपळे सौदागर येथील पारस रिवेरा सोसायटीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत फ्लश टँकमध्ये एक लिटर पाण्याची बाटली ठेवण्याचा सोपा उपाय अवलंबण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक फ्लशवेळी एक लिटर पाणी बचत होत आहे. सोसायटीतील ४० फ्लॅट्समध्ये हा प्रयोग राबविल्याने दररोज सुमारे ६४० लिटर, तर महिन्याला १९ हजार लिटरपेक्षा अधिक पाणी बचत होत आहे.
या उपक्रमाबाबत नगरसेविका डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी नागरिकांनी छोट्या उपाययोजनांद्वारे मोठी पाणी बचत साध्य करावी, असे आवाहन केले.
पाणी बचतीच्या या उपक्रमात प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन पर प्रमाणपत्र आणि सोसायटीला डस्टबीन देण्यात येणार असल्याची माहिती उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी दिली.
या उपक्रमामुळे शहरात पाणी बचतीबाबत जनजागृती वाढत असून, पुढील काळात अधिक सोसायट्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.








