- शिवचरित्र संकलनाला दाद…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मार्च २०२६) :- थेरगाव येथील कवी व लेखक संभाजी बाळासाहेब बारणे यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांची भेट घेत आपल्या कवितासंग्रहाचे पुस्तक भेट दिले. शहराच्या संस्कृती व विकासाचे प्रभावी चित्रण करणाऱ्या या पुस्तकाचे महापौरांनी कौतुक केले.
बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ५५१ शिवचरित्रांचे संकलन पूर्ण केल्याची माहिती दिली. त्यांच्या संशोधनपर कार्याचे महापौरांनी अभिनंदन केले.
‘थेरगावचा इतिहास’ या पुस्तकाद्वारे त्यांनी स्थानिक वारसा जतन केला आहे. तसेच त्यांच्या संकलनाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनीही बारणे यांच्या कार्याचे कौतुक केले. सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक क्षेत्रातील त्यांचे योगदान शहरासाठी अभिमानास्पद असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.








