न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पिंपरी चिंचवड अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने ‘महापौर चषक ६३ वी राष्ट्रीय अजिंक्यपद व ६३ वी ज्युनियर शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील भव्य स्पर्धेला देशभरातील खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणाऱ्या या स्पर्धेत विविध राज्यांमधून ४४५ पुरुष व ५० महिला खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत ज्युनियर व वरिष्ठ गटातील विविध वजनी प्रकारांमध्ये शरीरसौष्ठव, क्लासिक, फिजीक व फिटनेस प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंकडून उत्कृष्ट शारीरिक बांधा, सादरीकरण कौशल्य, शिस्तबद्ध तयारी आणि कठोर परिश्रम यांचे प्रभावी प्रदर्शन केले जात आहे. परीक्षकांच्या उपस्थितीत प्राथमिक फेऱ्या, उपांत्य व अंतिम फेऱ्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत असून स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
या स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची कामगिरी प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत स्पर्धेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून खेळाडू, प्रशिक्षक व प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा, निवास व तांत्रिक व्यवस्थेची योग्य तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहराची क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक उंचावली जात आहे.
स्पर्धेचा २९ मार्च २०२६ रोजीचा निकाल…
ज्युनियर पुरुष बॉडीबिल्डिंग ५५ किलो.
१) मनीष म्हात्रे – महाराष्ट्र
२) अक्षय – दिल्ली
३) संताणू मल्लीक – ओडिशा
४) सानू बेहेरा – ओडिशा
५) कैलास बिस्वाल – ओडिशा
६) विशाल खुडे – महाराष्ट्र
ज्युनियर पुरुष बॉडीबिल्डिंग ६० किलो.
१) अनिल सामंत्राय – ओडिशा
२) चंदन दास – ओडिशा
३) राहुल – दिल्ली
४) एस. लिखित – आंध्र प्रदेश
५) रोहन भोसले – महाराष्ट्र
६) सुमित परब – महाराष्ट्र
ज्युनियर पुरुष बॉडीबिल्डिंग ६५ किलो.
१) नवीन विश्वकर्मा – उत्तर प्रदेश
२) मंथन पाटील – महाराष्ट्र
४) सायला तलवार – गोवा
५) रघुनाथ मोहपात्रा – ओडिशा
६) विपुल राज – विदर्भ
ज्युनियर पुरुष बॉडीबिल्डिंग ७० किलो.
१) अर्पण सपकाळ – महाराष्ट्र
२) शुभम वीर – महाराष्ट्र
३) मयूर कोनवार – आसाम
४) प्रणव दास – केरळ
५) श्रीतेज जाधव – महाराष्ट्र
६) दारीस दाबरे – महाराष्ट्र
ज्युनियर पुरुष बॉडीबिल्डिंग ७५ किलो.
१) साहिल सावंत – महाराष्ट्र
२) फेबिन बैजू – केरळ
३) हरिंद्रनाथ आर – केरळ
ज्युनियर पुरुष बॉडीबिल्डिंग ८० किलो.
१) विशाल वसावा – गुजरात
२) शहनवाज कादरी – ओडिशा
३) हृषीकेश मेहर – महाराष्ट्र
४) शशिकांत यादव – राजस्थान
५) एल. कन्नन – पुदुचेरी
ज्युनियर पुरुष बॉडीबिल्डिंग ८० किलोपेक्षा जास्त.
१) कांतम कुमार – आंध्र प्रदेश
२) आयुष तांडेल– महाराष्ट्र
३) मिधुन सायमन – केरळ
४) रियॉन कोळी – महाराष्ट्र
ज्युनियर पुरुष क्लासिक (१७१ सेमी पर्यंत).
१) शुभम वीर – महाराष्ट्र
२) चंदन दास – ओडिशा
३) अर्पण सपकाळ – महाराष्ट्र
४) अनिल सामंत्राय – ओडिशा
५) साहिल सावंत – महाराष्ट्र
६) पिंटू सरकार – पश्चिम बंगाल
ज्युनियर पुरुष क्लासिक (१७५ सेमी पर्यंत).
१) दारीस दाबरे – महाराष्ट्र
२) आकाश तिवारी – महाराष्ट्र
ज्युनियर पुरुष क्लासिक (१८० सेमी पर्यंत).
१) प्रणव पवार – महाराष्ट्र
२) हृषीकेश मेहर – महाराष्ट्र
ज्युनियर पुरुष फिजीक (१७१ सेमी पर्यंत).
१) आकाश दडमल – महाराष्ट्र
२) जय नवगिरे – महाराष्ट्र
३) अभिषेक सिंग – मणिपूर
४) सरोज मनीष – गुजरात
५) भावेश – गोवा
६) मौसुम गोगोई – आसाम
ज्युनियर पुरुष फिजीक (१७५ सेमी पर्यंत).
१) जिंटू कर – आसाम
२) समाधान निसाळ – महाराष्ट्र
३) सुशांत जाधव – महाराष्ट्र
४) संग्राम राऊत – ओडिशा
५) भूपेंद्र वर्मा – महाराष्ट्र
६) सचिन सिंग – उत्तर प्रदेश
ज्युनियर पुरुष फिजीक (१८० सेमीपेक्षा कमी).
१) निलेश गुरव – महाराष्ट्र
२) मयूर शिंदे – महाराष्ट्र
३) अंकुर चौधरी – आसाम
४) गौरव ठाकरे – महाराष्ट्र
५) मोहम्मद इब्राहिम – पुदुचेरी
ज्युनियर पुरुष फिजीक (१८० सेमीपेक्षा जास्त).
१) स्वागतम पाटील – महाराष्ट्र
२) दीपक साहू – ओडिशा
३) जयिश परदेशी – महाराष्ट्र
४) एमडी रिझवान – ओडिशा
५) लशाश महावंशी – गुजरात
पुरुष फिजिकल चॅलेंज (खुला गट).
१) नितेश भंडारी – महाराष्ट्र
२) सुधीर मंकार – महाराष्ट्र
३) ई. सूर्यनारायण – तेलंगणा
४) कृष्णा बागुल – महाराष्ट्र
५) राजुभाई मारवडिया – गुजरात
६) श्रीरामचंद्रन – तेलंगणा
ज्युनियर महिला फिजीक (खुला गट).
१) खुशी नांबियार – गोवा
२) रिद्धी पारकर – महाराष्ट्र
ज्युनियर महिला बॉडी फिटनेस (खुला गट).
१) खुशी नांबियार – गोवा
२) आराध्या नायर – केरळ
३) लक्ष्मी हंसदाह – ओडिशा
४) वर्णा एम – केरळ
५) अनुस्मिता डेकराजा – आसाम
६) रिद्धी पारकर – महाराष्ट्र
पुरुष मास्टर्स (४० वर्षांवरील).
१) कमलेश आचरा – महाराष्ट्र
२) मनोहर बोचरे – महाराष्ट्र
३) दत्ताराज नाईक – महाराष्ट्र
४) कोईरेम्बा सिंग – महाराष्ट्र
५) चिराग पाटील – महाराष्ट्र
६) बेर्नार्ड – केरळ
पुरुष मास्टर्स (५० वर्षांवरील).
१) रवींद्र माने – नेव्ही
२) सुरेश ए – केरळ
३) मोमोटोम्बा सिंग – मणिपूर
४) सुदेश सापळे – महाराष्ट्र
५) प्रफुल्ल हळदणकर – महाराष्ट्र
६) पाओनाम मेइती – मणिपूर








