- अरुण पवार यांच्या पाठपुराव्याला यश; पिंपळे गुरवकरांना दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- पिंपळे गुरव परिसरातील सृष्टी चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीवर अखेर तोडगा निघाला असून येथे लवकरच ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. ‘मराठवाडा जनविकास संघा’चे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने या मागणीची दखल घेतली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या चौकात सिग्नल नसल्याने वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत होते. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अपघाताचा धोका देखील वाढला होता.
या समस्येकडे लक्ष वेधत अरुण पवार यांनी वाहतूक शाखेकडे लेखी निवेदन सादर केले होते. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत येथे सिग्नल बसवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे वाहतुकीला शिस्त लागून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.














