न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस अंमलदार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयुक्तालयात सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवनेरी हॉल’ येथे हा कार्यक्रम पार पडला. सेवानिवृत्त होणाऱ्या अमलदारांमध्ये अशोक विनायक पवार (पोलीस उपनिरीक्षक, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन), राजू तानाजी चौधरी (पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय) आणि शिवाजी बापुराव गोरे (पोलीस शिपाई, पोलीस मुख्यालय) यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त अमलदारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कर्मचारी वर्ग तसेच सेवानिवृत्त अमलदारांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.














