न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ चिंचवड स्टेशन व जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात एकूण ११७ बाटल्या रक्तदान करण्यात आले. तसेच १५० नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व १२० जणांची दंत तपासणी करण्यात आली.
या उपक्रमासाठी श्री संघाचे अध्यक्ष अशोक लुंकड व सेक्रेटरी सतिश मेहेर, तसेच जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष मयुर पगारीया व सेक्रेटरी निलेश लुंकड यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमावेळी राहुल लुंकड, हर्शल लुंकड, डॉ. अशोक बोरा, विलास बागमार, तसेच माजी अध्यक्ष राजेंद्र धोका, सतिश खाबिया, संजय जैन, सुहास लुंकड, संजय जैन, सचिन मुथा व हर्शल बाठीया उपस्थित होते. शेवटी निलेश लुंकड यांनी रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन आभार मानले.














