न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ एप्रिल २०२६) :- दिघी-आळंदी परिसरात आयोजित शोभा यात्रेनिमित्त पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून तात्पुरते वाहतूक बदल जाहीर करण्यात आले आहेत. श्री क्षेत्र आळंदी येथे विविध मंडळांच्या वतीने होणाऱ्या या यात्रेत सुमारे १००० ते १२०० भाविक सहभागी होणार असल्याने गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० ते रात्री ९.०० या वेळेत आळंदी फाटा चौक ते आळंदी तसेच चाकण चौक ते इंद्रायणी हॉस्पिटल मार्गावर सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. अत्यावश्यक सेवांची वाहने मात्र वगळण्यात आली आहेत.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी भारतमाता चौक, मोशी, भोसरी, चिखली फाटा तसेच पुणे-नाशिक महामार्ग आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.


















