- मॅन्युअल फिटनेस सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ एप्रिल २०२६) :- राज्यातील आरटीओ कार्यालयांमध्ये व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने रिक्षा चालकांचे मोठे नुकसान होत आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने मॅन्युअल फिटनेस सुरू करण्याची मागणी केली आहे.
२४ फेब्रुवारी २०२६ पासून ‘ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन’ प्रणाली लागू करण्याच्या नावाखाली मॅन्युअल तपासणी बंद करण्यात आली. मात्र, नवीन यंत्रणा पूर्णपणे सुरू नसल्याने हजारो रिक्षांचे नूतनीकरण रखडले आहे. परिणामी चालकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत असून उत्पन्न बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले आहे.
लवकर निर्णय न झाल्यास डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.














