न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे मोशी येथील गट क्र. २३० मधील ॲमिनिटी स्पेसमध्ये मैदान विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. हा समारंभ आ. महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडणार असून, याची माहिती रवि लांडगे यांनी दिली आहे.
कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित राहतील.
विविध पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारीही सहभागी होणार आहेत. या मैदानामुळे स्थानिक नागरिकांना क्रीडा व विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध होणार असून परिसराचा विकास होण्यास मदत होईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
















