न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे मुळा नदीवरील सांगवी–बोपोडी पुलावरील विद्युत रोषणाई व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सांगवी येथे पार पडणार आहे. हा समारंभ आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते होणार असून, पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरणही यावेळी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.
कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, महेश लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
या कामामुळे पुलाचे सौंदर्य वाढून नागरिकांना आकर्षक व सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











