- आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धेचा काळेवाडीत शुभारंभ…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- आमदार शंकरभाऊ जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात खेळाडूंसाठी उत्कृष्ट सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. ‘आमदार चषक’ सारख्या व्यासपीठामुळे स्थानिक स्तरावरील गुणवान खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केले.
चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काळेवाडी येथे भव्य ‘आमदार चषक’ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी काळेवाडीतील ज्योतिबा उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन कोर्टवर या स्पर्धेचे उद्घाटन स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
खेळ केवळ हार-जितीसाठी नसून तो आयुष्यात शिस्त आणि जिद्द निर्माण करतो.” हीच तरुण पिढी भविष्यात सक्षम भारत घडवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
यावेळी, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर, नरेश खुळे, विलास पाडाळे, सचिन काळे, सागर तापकीर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन गोपाळ माळेकर आणि पवना हेल्थ क्लबच्या टीमने केले आहे.
आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेने परिसरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून, स्थानिक खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.
आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “आमदार चषक” स्पर्धेमुळे काळेवाडी परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी चालना मिळाली असून, आगामी काळात अशा स्पर्धांमधून नव्या प्रतिभेला हक्काचे मैदान मिळाले आहे.
-अभिषेक बारणे, सभापती स्थायी समिती – पिंपरी चिंचवड महापालिका.










