- उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..
- शाळेचे चेअरमन संदीप काटे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि.१६ एप्रिल २०२६) :- CBSE इयत्ता दहावी (२०२५–२६) चा निकाल जाहीर झाला असून पिंपळे सौदागर येथील Challenger Public School ने यंदा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले आहे.
या परीक्षेत प्रेक्षा रथ हिने ९७.८% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर सौम्या सवई हिने ९७.६% आणि कनक राय हिने ९७.४% गुण मिळवत अव्वल यादीत स्थान मिळवले. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही उच्च टक्केवारी मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली आहे.
चिन्मयी एम (९७%), तन्वी कोहळे (९५.४%), निमिष काळे (९५%), दिशा किवांडे (९४%), अक्षीत तिवारी (९३%) आणि अक्षीत गुप्ता (९२.६%) या विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या यशाबद्दल शाळेचे चेअरमन संदीप काटे सर तसेच प्राचार्या ज्योतीका मलकानी मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला, असे त्यांनी सांगितले. शाळेचा सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकाल पाहता Challenger Public School ही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख निर्माण करत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.










