न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७. एप्रिल २०२६) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावी (CBSE) बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये ईशान गाडेकर याने ९८.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याने इंग्रजी व आयटी विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण, तसेच सामाजिक शास्त्रात ९९ गुण मिळविले. अवनी मंडोत व मनस्वी मराठे यांनी ९८ टक्के गुणांसह संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांनीही इंग्रजी व आयटी विषयात पूर्ण गुण प्राप्त केले. निश्चल बडजाते याने ९७.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला असून त्यानेही इंग्रजी व आयटी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले.
तसेच रुद्र मंचेकर, तन्वी कापसे, वेदांत सुर्वे, आरुल महिंद्रकर, रघुवीर बिरादार, अन्विता चिंचोलीकर आणि प्रज्ज्वल रेखावर यांनीही ९४.६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा तसेच इतर शिक्षणतज्ज्ञांनी शाळेच्या प्राचार्या डॉ. वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्या लिझा सोजू, समन्वयिका गुलनाज खान व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्कृष्ट निकालासाठी घेतलेल्या परिश्रमांबद्दल सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.










