- ऑनलाइन, महिला, दिव्यांग आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना विशेष लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७. एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मालमत्ताधारकांसाठी १६ प्रकारच्या सवलती जाहीर केल्या आहेत. १ एप्रिलपासून लागू झालेल्या या योजनेअंतर्गत ३० जूनपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना ५ टक्के सामान्य कर सवलत दिली जाणार असून, ऑनलाइन भरणा केल्यास अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळणार आहे.
महिला मालकांना ३० टक्के, दिव्यांग व स्वातंत्र्यसैनिकांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच ऑनसाइट कंपोस्टिंग, एसटीपी, झिरो वेस्ट यांसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांना ३ ते १० टक्क्यांपर्यंत कर सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांनी वेळेत कर भरून शहर विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. तर उपायुक्त सचिन पवार यांनी सवलतींचा लाभ घेण्यासाठी निर्धारित मुदतीत कर भरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.










