- किवळे व चिंचवड परिसरात तीन फलक हटवले…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२३ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील विनापरवाना जाहिरात फलकांविरोधात कारवाई तीव्र केली असून किवळे व चिंचवड परिसरातील तीन फलक निष्कासित करण्यात आले. कातळेवस्ती, एन.डी.एस. बँक्वेट्स लॉनसमोर २०x२० आकाराचे दोन फलक आणि मोरया गोसावी मंदिरासमोरील १०x१० आकाराचा एक फलक हटविण्यात आला.
महापालिका अधिनियम २४४ व २४५ तसेच ९ मे २०२२ च्या जाहिरात नियमन नियमांनुसार फलक उभारण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
“शहराचे नियोजन व सुरक्षितता राखण्यासाठी नियमांचे पालन आवश्यक असून ही कारवाई सुव्यवस्थेसाठी आहे,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तर “अनधिकृत फलकांना थारा दिला जाणार नाही,” असा इशारा उपायुक्त राजेश आगळे यांनी दिला.











