- पिंपरी चिंचवड महापालिकेचा जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम
- न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२३ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “क” क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पांडवनगर, भोसरी येथे “स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६” अनुषंगाने नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत नागरिकांना सामूहिक शपथ देण्यात आली.
“माझे शहर, माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत शहरभर विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. भाजी मंडई, रस्ते, सिग्नल, शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेबाबत संदेश देत नागरिकांना कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा कमी वापर आणि सार्वजनिक स्वच्छतेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या उपक्रमातून नागरिक, व्यापारी व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न होत असून, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
कोट : “स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून नागरिकांच्या सहभागातूनच शहर स्वच्छ सर्वेक्षणात अग्रस्थानी राहील,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.











