- पिंपरीत रंगला हृदयस्पर्शी एकपात्री प्रयोग; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० एप्रिल २०२६) :- माता रमाई आंबेडकर यांच्या त्याग, संघर्ष आणि समर्पणाचा जीवनप्रवास उलगडणारा ‘मी रमाई’ हा एकपात्री नाट्यप्रयोग पिंपरीत रंगला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने प्रस्तावित ‘रमाई सृष्टी’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मराठी अभिनेत्री प्रियांका उबाळे यांनी प्रभावी सादरीकरणातून रमाईंच्या आयुष्यातील गरिबी, संघर्ष आणि त्याग जिवंत केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणकाळात रमाईंची झुंज, संसारातील संकटे आणि मानसिक ताकद यांचे वास्तववादी चित्रण प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे ठरले.
कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. या नाट्यप्रयोगातून रमाईंच्या अदृश्य योगदानाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रभावीपणे साध्य झाला.












