- नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा; महापालिकेचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरात जनगणना २०२७ प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी नागरिकांना स्वयं-नोंदणीद्वारे सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे.
यंदा अचूक व पारदर्शक माहिती संकलनावर विशेष भर देण्यात आला असून, स्वयं-नोंदणी प्रक्रिया सोपी, जलद आणि सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १६ मे ते १४ जूनदरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील.
उप आयुक्त सचिन पवार यांनी नागरिकांचा सहभाग शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांनी जबाबदारीने अचूक माहिती देण्याचे आवाहन केले.
ही जनगणना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरणार असून, प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.












