न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल यंदा ९९ टक्के लागला.
विद्यार्थिनी श्रेया जडे हिने ९६.४०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृती टोणपे हिने ८९.८०% गुणांसह द्वितीय, तर संप्रदा जाधव हिने ८९.४०% गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.














