- छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वासाठी जोरदार तयारी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर येथे १० ते १४ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वा’च्या तयारीला वेग आला आहे. कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या रंगमंचाच्या कामाचा शुभारंभ महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार, कार्य आणि इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जागर निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.”
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य कुशाग्र कदम, तुषार हिंगे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, निलेश नेवाळे तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी वाहनतळ, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या.














