- कद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची उपस्थिती; १८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मे २०२६) :- डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी येथे १७ वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. केंद्रीय दळणवळण मंत्री तथा ईशान्य क्षेत्र विकास मंत्री Jyotiraditya Scindia हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते.
या समारंभात विविध विद्याशाखांतील १८ हजार ७२० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ४८ पीएच.डी., १६ हजार ७५२ पदव्युत्तर पदवी, १ हजार ९०५ पदवी आणि १५ पदविका धारकांचा समावेश होता. विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या ३० विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग आणि डॉ. ए. एल. काकराणी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
सिंधिया यांनी “विकसित भारत २०४७ साठी युवकांनी परिवर्तनाचे नेतृत्व करावे,” असे आवाहन केले. तर डॉ. पी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी करावा, असे सांगितले.














