न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मे २०२६) :- स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेत देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले. नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला अभिप्राय नोंदवणे आवश्यक आहे.”
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षण अभिप्राय पोर्टल वर जाऊन अभिप्राय नोंदवता येणार आहे.














