न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ मे २०२६) :- आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त सहकारनगर येथील कामगार कल्याण भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ध्वजारोहन गुणवंत कामगार महमंदशरीफ मुलाणी यांच्या हस्ते व गुणवंत कामगार बाळासाहेब साळुंके, प्रा. सागर खळदकर, उध्दव रामसने, प्रमोद जोशी, कामगार कल्याण सहआयुक्त मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले. बाळासाहेब साळुंके यांनी बदलते कामगार कायदे या विषयावर विचार व्यक्त करीत बदलत्या कामगार कायद्यामुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली. प्रा. सागर खळदकर यांनी विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात महमंदशरीफ मुलाणी यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शहीद झालेल्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहिर अमर शेख, प्र.के.अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या साहित्यातून, पोवाड्यातुन जनजागृती केली.
दरम्यान, विजयी खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात आला. सिराज मुलाणी, नंदकुमार धुमाळ, वसीम मुलाणी, पांडुरंग सुतार, यासिन शेख, रघुनाथ फेगडे, शकील मुलाणी, झहीर मुलाणी यांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन संजय थोरात यांनी, आभार सुहास माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. कळंबे, श्री. जोशी, मंडळाचे सर्व केंद्रसेवक श्रीमती बाठे, श्रीमती पांगारे, श्री. प्रविण श्रीवास यांनी प्रयत्न केले.














