न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १३ मे २०२६) :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त बोऱ्हाडेवाडी-मोशी येथील ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ येथे १४ व १५ मे रोजी भव्य प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात ऐतिहासिक लाईट शो, आकर्षक विद्युत रोषणाई आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शन सादर करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत धर्मवीर शंभूराजेंच्या पराक्रमाचा इतिहास आधुनिक प्रकाशयोजना आणि ध्वनी माध्यमांतून उलगडण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता प्रतिमेला दुग्धाभिषेक व पूजाअर्चा होणार असून सकाळी १० ते सायंकाळी ७ दरम्यान शिवकालीन तलवारी, ढाली, भाले व युद्धसामग्रीचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हजारो शिवप्रेमी उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.














