न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ मे २०२६) :- स्वर्गीय प्रमोदजी महाजन स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहर योजना लवकरच सुरू करण्यात येणार असून, नागरिकांच्या लोकसहभागातून ती यशस्वी केली जाईल, अशी घोषणा महापौर रवि लांडगे यांनी केली.
निगडी प्राधिकरण येथील गणेश तलाव, सेक्टर २६ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढ आणि वृक्षसंवर्धन जनजागृती हा उपक्रमाचा उद्देश आहे.
शहरात तब्बल दोन लाख वृक्ष लागवडीचे नियोजन असून, सामाजिक संस्था व नागरिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘डेन्स फॉरेस्ट’ संकल्पनेद्वारे तापमान कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.














