न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ मे २०२६) :- आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १५ हजार ४७८ युवक-युवतींनी रोजगारासाठी नोंदणी केली. नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात १२० नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती घेण्यात आल्या. यामधून ७ हजारांहून अधिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप यांनी कौशल्य विकासाला आजच्या काळात विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. “केवळ पदवी नव्हे तर कौशल्याच्या बळावरच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल,” असे त्यांनी नमूद केले. पुणे शहर जागतिक स्तरावर ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून विकसित होत असल्याचे सांगत त्यांनी उद्…














